school
school 
मुंबई

...म्हणून पालकांचा जूनमध्ये शाळा सुरू करण्यास कडाडून विरोध

सकाळवृत्तसेवा

मयूरी चव्हाण-काकडे

कल्याण  : येत्या 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा मानस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला होता. मात्र, या भूमिकेला पालकांसह शिक्षणतज्ज्ञांनी तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर जूनमध्ये शाळा सुरू करायची की नाही? शाळेत पाळावयाचे नियम, शिक्षणपद्धती याबाबत आपली मते मुख्यमंत्री कार्यालायत ई-मेलद्वारे पाठवायला तज्ज्ञांनी सुरुवात केली आहे. जूनमध्ये शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. तर लहान मुलांची रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याने जून महिन्यात आम्ही मुलांना शाळेत पाठवणारच नाही, अशी ठाम भूमिका पालकांनी घेतली आहे. 

कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू करायचे? यावर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाला मार्गदर्शक सूचना पाठवण्यास तज्ज्ञांनी सुरुवात केली आहे. यामध्ये जूनपासून शाळा सुरू न करता दोन महिने कोरोना आजाराची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे मत सरकारकडे नोंदविले जात आहे. ऑगस्टपर्यंतही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर वेगळा विचार करा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. तर काहींनी सप्टेंबर महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरू करून 80 वार्षिक सुट्ट्यांपैकी 75 सुट्ट्या रद्द कराव्यात जेणेकरून अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, असे मतही नोंदवले आहे. 

त्यामुळे जूनमध्ये शाळा सुरू होणार की नाही? याबाबत पालकांमध्ये  संभ्रम वातावरण असून शाळांनी याबाबत मात्र कोणतीही अधिसूचना जारी केली नसल्याचे विविध शाळा प्रशासनाने 'सकाळ'.शी बोलताना सांगितले. त्यामुळे जून महिन्यात शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर असल्याचे दिसून येते. 

काय आहेत समस्या ? 
- लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी 
-  शाळेत पुस्तक वह्यांची वारंवार हाताळणी 
- सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन 
- विद्यार्थ्यांचे तोंड, डोळे, नाकाला नकळतपणे हात लावणे
- जनजागृतीचे आवाहन

 


-  भविष्यात शहरी भागातील विद्यार्थी जवळच्या शाळेत गेले तर प्रवास टळेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने बस सेवा सुरू करावी. तसेच जूनमध्ये शाळा सुरू करण्याची घाई करू नये, असे मत सरकारला इमेलद्वारे कळविण्यात आला आहे. संघटना स्तरावर काम करणारे तज्ज्ञही इमेलद्वारे आपल्या सूचना सरकारकडे मांडत असल्याने यावर योग्य निर्णय सरकार घेईल, ही अपेक्षा आहे.
- गुलाबराव पाटील, 
मुख्याध्यापक, कल्याण

-  मुलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे आणखी काही दिवस शाळा बुडाली तरी चालेल. जूनमध्ये शाळा सुरू होण्याबाबत पालकांमध्ये संभ्रमाचे आणि भीतीदायक वातावरण आहे. मात्र तूर्तास मुलांना शाळेत न पाठवण्यावर पालकवर्ग ठाम आहेत. 
-प्रियांका वाराणकर, 
पालक, डोंबिवली

- शिक्षण मंत्र्यांनी एखादा मानस व्यक्त करण्यापूर्वी आरोग्य, गृह इतर खात्यांशी चर्चा करावी. यंदाचे वर्ष हे आर्थिक संकटाचे आणि जीव वाचवण्याचे वर्ष आहे. शाळा सुरू करण्याची घाई करू नये; कारण पावसाळ्यात साथीच्या रोगांचाही प्रादुर्भाव होतो. त्यामुळे नवीन समस्या निर्माण होतील. रेड झोनमधील शाळांचाही प्रश्न मोठा असून याबाबत ई-मेलद्वारे सरकारला कळविण्यात आले आहे. 
-सुधीर घागस, सचिव, 
महाराष्ट्र राज्य, शिक्षण क्रांती संघटना. 

 School academic session to begin June oppositionto parents


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT